सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने समाधान झाले – नांबी नारायणन

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपल्याला समाधान झाले आहे असे इस्त्रोचे माजी वैज्ञानिक नांबी नारायणयन यांनी म्हटले आहे. तथापी अशा प्रकरणांत चौकशीची कालमर्यादा निश्‍चीत झाली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

76 वर्षीय नारायणन यांच्यावरील या प्रकरणाची सुनावणी बरेच दिवस प्रलंबीत होती त्यामुळे त्यांना बराच मनस्ताप सोसावा लागला आहे. तथापी या निकालामुळे आपल्याला आता बरे वाटत आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपल्याला 50 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे पण ते पैसे आपल्याला या प्रकरणात खोटे अडकवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून वसुल केले पाहिजेत आणि त्यांनाही दंड झाला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

केरळ पोलिस दलाचे माजी पोलिस महासंचालक सीबी मॅथ्यु यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने या हेरगीरी प्रकरणाचा तपास केला होता. आणि त्यांनीच नारायणन यांना अटक केली होती. मॅथ्यु यांनी मात्र या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)