सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सुचना

बहुपत्नीत्व आणि निकाह हलालाच्या घटनात्मक वैधतेबाबत भूमिका स्पष्ट करा
नवी दिल्ली – मुस्लिमांमधील बहुपत्नीत्व आणि निकाह हलालाला घटनात्मक वैधता नाही अशा आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या असून त्याविषयी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. विधी आयोगालाही या संबंधात भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने तिहेरी तलाक घटना विरोधी घोषित केला आहे पण निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वाचा विषय अद्याप चर्चेसाठी खुला ठेवला आहे. त्यावर आज सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीच्यावेळी यावर केंद्राला आणि विधी आयोगाला आपली भूमिका मांडण्यास सांगण्यात आले आहे. मुस्लिमांमधील या प्रथेविषयी निर्णय घेण्यासाठी पुन्हा पाच न्यायाधिशांचे एक वेगळे घटनापीठ स्थापन केले जाणार आहे असेही न्यायालयाने आज सांगितले.

मुस्लिमांमध्ये चार पत्नी करण्याची प्रथा आहे. तर निकाह हलाला मध्ये घटस्फोट घेतलेल्या महिलेला पुन्हा आपल्या पहिल्या पतीबरोबर विवाह करायचा असेल तर तिला दुसऱ्या इसमाबरोबर लग्न करून घटस्फोट घ्यावा लागतो अशी तरतूद आहे. ती घटनात्मकदृष्ट्या वैध नाही असे काहीं जणांचे म्हणणे आहे त्यावर सध्या न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. ही तरतूद घटनेतील स्त्री-पुरूष समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे असा आक्षेप घेणाऱ्या अनेक याचिका सध्या न्यायालयात दाखल करण्यात आल्या असून त्यांची एकत्रित सुनावणी सुरू आहे. याचिका कर्त्यांमध्ये दिल्ली भाजपचे नेते अश्‍विनीकुमार उपाध्याय यांचाही समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)