सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा संविधानाचा विजय -कॉंग्रेस

नवी दिल्ली:  सर्वोच्च न्यायालयाने भाजपला उद्या शनिवारी कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊन  दणका दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने आनंद व्यक्त करतानाच हा संविधानाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तर उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केला आहे.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी असंविधानिक निर्णय घेतला होता, या आमच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालने शिक्कामोर्तब केले आहे, असे ट्विट काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.  भाजपमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही, हे न्यायालयाच्याही लक्षात आले आहे. कायदेशीर बाबीत भाजप मागे पडला आहे. आता ते साम, दाम, दंड, भेदाचा अवलंब करून बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, अशी टीकाही राहुल यांनी केली आहे.

तर आम्ही मुख्य सचिवांशी चर्चा केली असून त्यांना उद्याच अधिवेशन घेण्यास सांगितले आहे. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करू याचा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे, असे येडियुरप्पा यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही बहुमत सिद्ध करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)