सर्वेश बिरमानेचा मानांकित खेळाडूवर विजय 

दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक टेनिस स्पर्धा 

पुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज (18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात सर्वेश बिरमाने याने मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्‍का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सर्वेश बिरमाने हरियाणाच्या सातव्या मानांकित गौरव गुलियाचा 4-6, 6-3, 6-4असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. गुजरातच्या चेतन गडियारने महाराष्ट्राच्या भृगेन बोन्द्रेचा टायब्रेकमध्ये 6-7(1), 6-2, 6-3असा पराभव केला. कणव गोयलने अभिषेक मांगलेला 2-6, 6-1, 6-2असे नमविले. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या आर्यन भाटियाने कर्नाटकाच्या शशांक नरडेवर 6-2, 7-5असा विजय मिळवला.

सविस्तर निकाल : पहिली फेरी : मुले – सुशांत दबस (हरियाणा) (1) वि.वि. हिरक वोरा (गुजरात)6-3, 6-1, अर्जुन कुंडू (गुजरात) वि.वि.अमन तेजाबवाला (महा) 7-5, 6-2, चेतन गडियार (गुजरात) वि.वि. भृगेन बोन्द्रे (महा) 6-7(1), 6-2, 6-3, उदित गोगोई (आसाम) वि.वि.यशराज दळवी (महा) 1-6, 6-3, 6-1, सुहित लंका (तेलंगणा) वि.वि. निलेंद्रनाथ भूपतसीन (गुजरात) 6-4, 6-4, मोहित बेंद्रे (गुजरात) वि.वि.आरव साने (महा) 6-0, 6-3, राजेश कन्नन (तामिळनाडू) (5) वि.वि.ओजस दबस (महा) 6-3, 6-0, सर्वेश बिरमाने(महा) वि.वि.गौरव गुलिया (हरियाणा) (7) 4-6, 6-3, 6-4, प्रणित कुदळे (महा) वि.वि.साहिल तांबट (महा) 7-5, 6-2, कणव गोयल (महा) वि.वि.अभिषेक मांगले (महा) 2-6, 6-1, 6-2, आर्यन भाटिया (महा) (4) वि.वि.शशांक नरडे (कर्नाटक) 6-2, 7-5, डेनिम यादव (मध्यप्रदेश) वि.वि. आदित्य बालसेकर (महा) 7-5, 5-7, 6-2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)