सर्वेश बिरमाणेचा मानांकित खेळाडूवर विजय

गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे: संजीत देवीनेनी, अनर्घ गांगुली, फैझ नस्याम, यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत विजय मिळवत आगेकूच केली. तर, सर्वेश बिरमाणे याने मानांकित खेळाडूवर विजय मिळवत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

-Ads-

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात सर्वेश बिरमाणे याने तिसऱ्या मानांकित अमन तेजाबवालाचा 6-4, 6-0असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. पाचव्या मानांकित सुहित रेड्डी लंकाने कार्तिक प्रहारचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(3)असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. फैज नस्यामने दक्ष अगरवालचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
तर, मुलींच्या गटात बिपाशा मेहन, सायना देशपांडे, प्रेरणा विचारे, आर्या पाटील, गार्गी पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

पहिली पात्रता फेरी:

संजीत देवीनेनी (भारत) (1) वि.वि. अर्जुन गोहड (भारत) 6-2, 6-2, अनर्घ गांगुली (भारत) वि.वि. अभुदया शर्मा (भारत) 6-2, 6-4, फैज नस्याम (भारत) वि.वि. दक्ष अगरवाल (भारत) 6-3, 6-2, प्रभाजीत चंढोक (भारत) वि.वि. कपिश खांडगे (भारत) 6-4, 6-4, सर्वेश बिरमाणे (भारत) वि.वि. अमन तेजाबवाला (भारत) (3) 6-4, 6-0, सुहित रेड्डी लंका (भारत) (5) वि.वि. कार्तिक प्रहार (भारत) 6-3, 7-6(3),
मुली:
बिपाशा मेहन (भारत) वि.वि. लोलाक्षी कांकरिया (भारत) 6-2, 6-1, सायना देशपांडे (भारत) वि.वि. व्योमा भास्कर (भारत) 6-0, 6-2, प्रेरणा विचारे (भारत) (7) वि.वि. वशिष्टा पठानीया (भारत) 6-3, 6-4, आर्या पाटील (भारत) वि.वि. तन्वीका सर्वानन (भारत) 6-1, 6-2, गार्गी पवार (भारत) (8) वि.वि. लालित्या कल्लूरी (भारत) 6-2, 6-2.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)