सर्वेक्षणाचे उद्योजकांकडून स्वागत

आगामी अर्थसंकल्पात मनुष्यबळ आणि कृषी क्षेत्रावर भर देण्याचा आग्रह

नवी दिल्ली – आगामी काळात सरकारने मनुष्यबळ विकास आणि कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेवर भर देण्याची गरज असल्याचे उद्योजकांच्या संघटनानी म्हटले आहे. त्याचबरोबर सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील बाबीचे स्वागत करण्यात आले आहे. पुढील वर्षी विकासदर सात ते साडेसात टक्‍के इतका होण्याची शक्‍यता सर्वेक्षणात व्यक्‍त करण्यात आली आहे, ही बाब समाधानकारक असल्याचे या संघटनांना वाटते.

परंपरागत तंत्रज्ञान बदलत आहे. त्यामुळे त्या तंत्रज्ञानावर आधारित रोजगाराचे प्रमाणही कमी होत आहे. भारतातील प्रचंड लोकसंख्या पाहता आगामी काळात रोजगार जास्तीत जास्त निर्माण करणारे उद्योग सुरू होण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या काम करीत असलेल्या तरुणांना व कामाच्या शोधातील तरुणांना आधुनिक कौशल्य मिळण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने आवश्‍यकता त्या उपाययोजना आणि पूरक वातावरणनिर्मिती करावी.
– देवेंद्र कुमार पंत, अर्थतज्ज्ञ, इंडिया रेटिंग

आगामी काळात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर सर्वासमावेशक विकासासाठी काय केले जाणार आहे, याचा आराखडा सर्वेक्षणात मांडला आहे. त्यामुळे आमचा आशावाद वाढला असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी सांगितले.

-Ads-

रोजगारनिर्मिती वाढण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात महिलांना रोजगार मिळण्याची जास्त गरज आहे. याचा उल्लेख सर्वेक्षणात करण्यात आला आहे. त्यासाठी कौशल्य विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर अरोग्य सुविधा वाढविल्यानंतर मनुष्यबळ बळकट होईल या बाबीकडे लक्ष देण्यात आल्याचे उद्योजकांच्या संघटनांनी सांगितले.

बॅंकाच्या आरोग्याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्यासाठी विवादाचा निपटारा लवकर व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. असे असले तरी वाढत असलेल्या क्रुडच्या दरामुळे महगागाई डोके वर काढण्याची शक्‍यता आहे. तीकडे जास्त लक्ष दिले तर विकासला खीळ बसणार नाही. या सर्व बाबी करीत असताना सरकारने राहीलेल्या सुधारणा करण्याची तेवढीच गरज आहे. तसे केले तरच दीर्घ पल्ल्यात विकासदर जास्त राहू शकणार असल्याचे असोचेमचे अध्यक्ष संदीप जजोडीया यांनी सांगितले.

इंडिया रेटींगमधील मुख्य अर्थतज्ज्ञ देवेंद्र कुमार पंत यानी सांगितले की, सर्वेक्षणात बराच आशावाद व्यक्‍त करण्यात आला आहे. मात्र, जागतिक परिस्थिती आणि क्रुडचे वाढत असलेले दर यामुळे भारतावर परिणाम होऊ शकतो. त्या अवस्थेत काय करायचे याचा पर्याय सरकारने तयार ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे परंपरागत काम कमी होत आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित काम युवकांना करता यावे याकरीता कौशल्य विकास मोहीम मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. या बाबी शालेय स्तरापासून सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)