सर्वाना जीएसटीएनची गरज नाही – आधिया

नवी दिल्ली, दि. 20- ज्यांना जीएसटीएन मिळालेला नाही त्यांनी तो मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाही. ते 1 जुलैपासून हंगामी आयडीच्या आधारावर व्यावसाईक काम व्यवसाय करू शकतात असे महसूल सचिव हसमुख आधिया यांनी सांगीतले आहे.

व्यापाऱ्याना दिलेल्या 15 आकडी हंगामी आयडी हाच जीएसटीएन म्हणून पहिले काही महिने काम करू शकणार आहे. सध्या जीएसटीएन म्हणजे जीएसटी करदाता ओळखपत्र क्रमांक मिळविण्यासाठी धावपळ चालू आहे. मात्र ज्यांच्याकडे हंगामी आयडी आहे, ते त्या आधारावर व्यवहार करू शकणार असल्याचे आधिया यांनी सांगीतले.
देशात 80 लाख अप्रत्यक्ष कर दाते आहेत. त्यात उत्पादन शुल्क, सेवा शूल्क आणि मुल्यवर्धीत कर दात्याचा समावेश आहे. आतापर्यंत त्यातील केवळ 65.6 लाख कर दात्याची नोंदणी झाली आहे.

अगोदर नोंदणी झाल्यानंतर हंगामी आयडी दिला जातो. त्यानंतर तपशील दिल्यानंतर जीएसटीएन दिला जातो. आता वेळ कमी आहे. त्यामुळे त्यानी जीएसटीएनसाठी व्यवहार थांबविण्याचे काही एक कारण नाही. मात्र त्यांनी लवकरात लवकर जीएसटीएन मिळविण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगीतले.  आता नव्या उद्योगाची आणि जीएसटीएनची प्रक्रीया पुन्हा सुरू होणार आहे. या नव्या करात 16 विविध कर एकत्रीत होणार आहेत. जास्त नफा मिळविता येणार नाही

जीएसटीनंतर काही वस्तूचे दर कमी होणार आहेत तर काही वस्तूचे वाढणार आहेत. त्याच कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. जर कर कमी होऊनही कोणी वस्तूचे दर कमी केले नाहीत तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी एक पाच सदस्यीय समिती नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
हे काम दोन वर्ष चालणार आहे. या समितीला माहीती मिळाल्यास ही समिती आपण होऊन कारवाई करेल. तसेच तक्रार आल्यानंतही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)