सर्वाना एकत्र आणणारा गणेशोत्सव (प्रभात Open House)

महाराष्ट्राला गणेशोत्सवाची परंपरा सव्वाशे वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी घालून दिली आणि ती आजतागायत गणेशभक्ताकडून अखंडपणे चालू आहे. टिळकांनी गणेशोत्सव सुरु करण्याचे अनेक उद्धेश अथवा दृष्टिकोन ठेवून उत्सव लोकांना सुरु करण्यास आणि लोक सहभागातून सर्वसमावेशक केला. यापाठीमागे लोकांमधील एकमेकांचा सहभाग वाढावा आणि हिंदू धर्माची लोकांमध्ये दृढतापूर्वक प्रसार होऊन अन्य धर्मीयाकडून हिंदू धर्मामधील अनुयायांना बळी पडण्यापासून बचाव करण्यासाठी आणि स्व:धर्मावरील विश्वास वाढवण्यासाठी हा उत्सव सुरु केला.

गणेशोत्सवामुळे लोक एकत्र येऊन एकमेकांच्या अडचणी आणि माहितीची देवाणघेवाण करून मार्ग काढू लागले. गणेशोत्सवामुळे हिंदू धर्माची; तसेच महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीला राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीवर एक आगळेवेगळे स्थान निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागातील अनेक वर्गामधील लोक वर्गणी स्वरूपात मदत काढून या उत्सवामध्ये सहभागी होतात. त्यामुळे सर्व वर्गातील लोक शेतकरी, मजूर, कष्टकरी, नोकरदार, उद्योजक, व्यवसायिक, राजकीय पुढारी आपल्या कामातील व्याप बाजूला ठेवून या उत्सवात सहभागी होऊन; तसेच ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जातात.

माझ्या गणेशोत्सवा मधील आठवणी बद्दल

जसे गणेशाचे आवडते खादय म्हणून मोदक आहे तो खाण्याचा आनंद जसा गणेशबाप्पा घेत असतो; तसाच प्रसाद स्वरूपात भक्त घेत असतात. तसेच अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन करण्यासाठी भरवले जातात.
इकोफ्रेंडली गणेशोत्सव हा पर्यावरणच्या  संवर्धनासाठी साजरा करायला हवा.
यामुळे पर्यावरणाची हनी टाळण्यास मदत होईल; तसेच पाणी प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण यापासून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. याशिवाय पर्यावरणापासून आपणास निरोगी जीवन जगण्यास मदत होईल.
गणेशोत्सवानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम आमच्या मंडळातर्फे राबविले जातात; यामध्ये वृक्षरोपन लागवड,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रुग्णांना आर्थिक मदत करण्याचे उपक्रम राबविले जातात.
अशाप्रकारे गणेशोत्सव दरवर्षी आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो.

– मारुती झेंडे, सासवड 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)