सर्वाधिक विकसित 20 शहरांत भारताची 10 शहरे

नवी दिल्ली – येत्या काही वर्षात जगातील वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या 20 देशांत भारताची 10 शहरे असल्याचे आणि त्यातही गुजरातमधील सुरत टॉपला अस्ण्याची माहिती ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक रिपोर्टमध्ये देण्यात आलेली आहे. ग्लोबल सिटीज रिसर्च नुसार गुजरातमधील सुरत शहर अत्यंत वेगाने विकास करत असून सन 2035 पर्यंत त्याची सरासरी वार्षिक वाढ 9.17 टक्के असणार आहे. या यादीत 8.58 टक्के वाढ दरासह आग्रा द्वितीय जागी आणि 8.5 टक्के वाढ दरासह बेंगळुरू तृतीय स्थानी आहे.

हिऱ्यांच्या व्यापाराचे शहर म्हणून सुरत जगभरात प्रसिद्ध आहे. येथून संपूर्ण जगभर हिरे पुरवले जातात. हिऱ्यांप्रमाणेच सुरत आयटी हब म्हणूनही प्रसिद्ध आहे. या बाबतीत बेंगळुरू, हैद्राबाद आणि चेन्नई ही शहरेही आघाडीवर आहेत. जर जीडीपीचा विचार केला, तर चिनी शहरांच्या तुलनेत भारतीय शहरांचा जीडीपी बराच कमी असणार आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता, या अहवलानुसार मुंबई शहर टॉप 10 शहरांच्या यादीतून बाहेर जाण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

नेहमीप्रमाणेच 2035 मध्ये न्यूयॉर्क शहरच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारे प्रथम क्रमांकाचे शहर असणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर टोकियो (जपान) आणि तिसऱ्या क्रमांकावर लॉस एंजेलिस असेल. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर शांघाय आणि लंडन ही शहरे असतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)