सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? (भाग-२)

सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? (भाग-१)

बाजारात गुंतवणूक करण्याची प्रमुख कारणं :

१. महागाई दरास मात देणं – ही गोष्ट अनेक गुंतवणूकदारांच्या अंगवळणी पडतच नाही. महागाई जर दर वर्षाला ६ टक्क्यानं वाढत आहे म्हणजेच आज १०० रुपयांत मिळणारी एखादी वस्तू पुढच्याच वर्षी १०६ रुपयांना मिळणार आहे व अशाप्राकारे तीच वस्तू १० वर्षानंतर खरेदी करण्यासाठी १७९ रुपये मोजावे लागणार आहेत. हाच महागाईचा दर कांही बाबतीत वार्षिक १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, उदा. शिक्षणाचा अथवा हॉस्पिटलचा खर्च. मग अशा परिस्थितीत जर आपली गुंतवणूक ४ % वार्षिक व्याज देणाऱ्या बचत खात्यात ठेवली तर ती गुंतवणूक नसून तोटाच ठरेल. त्याचप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसीमधील गुंतवणुकीचा परतावा हा ६-७ टक्क्यांपेक्षा जास्त नसतो परंतु ‘गॅरेंटेड’ या नावाखाली आपण भुलतो व जी गोष्ट जोखीम हस्तांतरीत (Transfer of Risk)  करण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी आहे तिच्यात गुंतवणूक करून आपण आपल्या गुंतवणूकपरताव्याची जोखीम वाढवतो.

२. एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणजे अधिक परतावा – ऐतिहासिक आकडेवारी आधारे हे सिद्ध होतं की इतर कोणत्याही गुंतवणूक माध्यमापेक्षा (Asset Class) मागील ३९ वर्षांत (१९७९ ते २०१८) शेअरबाजारानं दिलेला परतावा हा अधिक आहे.

३. पैसा आपल्यासाठी काम करतो – अनेक लोक म्हणतात सर्व दुःखाचं मूळ हे पैसा आहे परंतु पैसा नसणं हे अनेकांच्या दुःखाचं कारण आहे. जर आपण योग्य कंपनीत, योग्य प्रकारे व योग्य भावात गुंतवणूक केल्यास त्या कंपनीला होणाऱ्या नफ्यातील हिश्यात आपला भाग असतो जो आपल्याला त्या कंपनीच्या शेअर्सच्या वाढलेल्या भावाच्या स्वरूपातून मिळवता येतो. म्हणजे स्वतः कोणतेही कष्ट न घेता आपला पैसा आपल्यासाठी काम करत असतो.

४. बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अगदी छोटी रक्कम देखील चालू शकते – अनेकांचा असा गैरसमज असतो की शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागते. परंतु, अगदी महिना ५०० रुपयांची देखील गुंतवणूक आपण शेअरबाजारात म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून करू शकतो.

५. बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपणांस खूप ज्ञान असणं आवश्यक नाही – तर म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सरकारी देखरेखीखाली आपल्या वतीनं ते काम योग्यप्रकारे पार पाडत असतात.

मग बाजारात गुंतवणूक कोणी करावी ?

१. ज्यांनी खूप पैसे घालवले असतील.

२. ज्यांना आपले नुकसान भरून काढायचे असेल.

३. ज्यांना पैसे कमवायचे असतील.

४. ज्यांना संपत्ती जमवायची असेल (Wealth Creation).

५. ज्यांना बाजाराबद्दल कुतूहल असेल.

६. ज्यांना बाजारात गुंतवणूक करायची असेल.

७. ज्यांना कर वाचवायचा असेल (ELSS Mutual Fund).

८. ज्यांना आपल्या गुंतवणुकीबाबत जोखीम घ्यायची तयारी असेल.

९.  ज्यांना शिस्तबद्ध गुंतवणूक करायची असेल.

१०. ज्यांना बाजारात केलेल्या गुंतवणुकीसाठी संयम आहे.

आता जरी दिवाळी सण संपला असला तरी बाजारात दिवाळी ही चालूच असते, फक्त गरज आहे ती साजरी करता येण्याची.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)