सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? (भाग-१)

मागील अनेक वर्षे सर्वसामान्य माणूस हा शेअर बाजारापासून चार हात दूरच राहिलेला आढळतो. याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीनं शेअर बाजारातून घेतलेला वाईट अनुभव म्हणजे नुकसान. जरी लहानपणापासून आपण एक म्हण शिकलो व इतरांना शिकवली देखील की, ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ परंतु बाजारात आलेलं अपयश ही यशाची पहिली पायरी असं कोणीही मानायला तयार होत नाही. कदाचित त्यामागं बाजार धार्जिण नसणं, अपयश म्हणजे अपशकून इ. गोष्टींनीच मनात घर केलेलं आढळून येतं. यामागं खरं म्हणजे बाजाराबद्दल, तेथील घडामोडीबद्दल असलेलं अज्ञान, बाजारात उतरल्यावर धरून ठेवलेला हट्ट, स्वतः अभ्यास न करता केलेली गुंतवणूक, बाजारातील गुंतवणुकीपासून बाळगलेल्या अव्वाच्या-सव्वा अपेक्षा, इ. गोष्टी आहेत.

अनेक लोक अशा अपेक्षेनं शेअर बाजाराकडं येतात की त्यांना शॉर्ट-कटने खूप पैसे कमवायचे असतात परंतु जोखीम घ्यायची तयारी नसते आणि बाजारात जोखीम ही नेहमीच असते, मग ती गुंतवणूक असो की ट्रेडिंग. तर अनेक लोक अगदी आनंदानं सांगतात की मी शेअर घेतला रे घेतला की तो खाली येतो, अगदी उच्चशिक्षित लोक देखील दाव्यानं सांगतात की आमच्या पोझिशन्स ह्या इतर ब्रोकर्सना कळतात म्हणून आम्ही घेतल्यावर इतर ब्रोकर्स आम्हाला कोंडीत पकडण्यासाठी त्या शेअर्सचा भाव पाडतात व तो शेअर खाली येतो. आणि आश्चर्याची बाब म्हणजे अशा लोकांच्या पोझिशन्स ह्या अगदीच नगण्य किंवा किरकोळ अशा असतात. मग बरेच लोक बाजाराला किंवा अगदी स्वतःच केलेल्या व्यवहाराला ‘जुगार’ नाव देऊन मोकळे होतात.

सर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? (भाग-२)

बाजारातून पैसे कमावण्यासाठी, तुमच्याकडं बाजाराबद्दलची अर्थातच ज्या कंपन्यांत गुंतवणूक करावयाची आहे त्यांबद्दलची दूरदृष्टी असावी, ते (शेअर्स) खरेदी करण्याचं धैर्य असावं आणि सर्वांत महत्वाचं म्हणजे ते सांभाळायचा संयम असणं गरजेचं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)