सर्वाधिक आवक होऊनही मटार, गाजराचे भाव स्थिर

पिंपरी – मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात फळभाज्यांची आवक वाढली असून, पालेभाज्यांची आवक मात्र घटली आहे. फळभाज्यांमध्ये मटार व गाजराची सर्वाधिक आवक झाली.तर पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीची आवक घटली आहे. फळभाज्यांची एकूण आवक एक हजार 347 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 21 हजार 460 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 298 क्विंटलने वाढली आहे; तर पालेभाज्यांची आवक दोन हजार 480 गडड्यांनी घटली आहे.

कांद्याची आवक एक क्विंटलने वाढून, भाव मात्र 100 रुपयांना वधारले. बटाट्याची 183 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 58 क्विंटलची वाढ झाली आहे; तर भावात 700 रुपयांची वाढ झाली. भेंडीची आवक 21 क्विंटलने घटून भावात 250 रुपयांची वाढ झाली.

गवारीची आवक तीन क्विंटलने वाढून, भाव 750 रुपयांनी वधारले. तसेच टोमॅटोची 50 क्विंटल आवक वाढून भावात सलग दुसऱ्या आठवड्यात 150 रुपयांची वाढ झाली. मटारची आवक 239 क्विंटलने वाढून भाव मात्र स्थिर राहिले. घेवड्याची आवक दोन क्विंटलने वाढून भाव 250 रुपयांनी घटला. दोडक्‍याची आवक एक क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी वाढले. लसणाची आवक 62 क्विंटलने घटून, भाव 300 रुपयांनी वधारले. आल्याची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी वधारले. मिरचीची आवक 17 क्विंटलने वाढून, भावदेखील 400 रुपयांनी वधारले. तसेच दुधी भोपळ्याची आवक नऊ क्विंटलने घटून, भाव 350 रुपयांनी वाढले.

कारल्याची आवक पाच क्विंटलने घटून, भावदेखील 500 रुपयांनी गडगडला. गाजराची आवक 49 किंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. फ्लॉवरची आवक 23 क्विंटलने वाढून भाव 150 रुपयांनी वधारला. कोबीची आवक 12 क्विंटलने घटून सलग तिसऱ्या आठवड्यात भाव मात्र स्थिर राहिले. वांग्याची आवक दोन क्विंटलने वाढूनही भाव मात्र स्थिर राहिले. लिंबाची आवक नऊ क्विंटलने वाढूनही भाव 750 रुपयांनी घटले. काकडीची आवक 23 क्विंटलने घटून भावात 350 रुपयांची वाढ झाली. पडवळची एक क्विंटल आवक होऊन, भाव 2000 रुपयांवर स्थिरावला.

शेवग्याची आवक सहा क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची घट झाली. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटलने घटून, भाव 750 रुपयांनी वाढले. तोंडल्यांची आवक एक क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. पावट्याची एक क्विंटल आवक वाढून, भावमात्र स्थिर राहिले. याशिवाय चवळीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 750 रुपयांनी वधारले. पापडीची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 250 रुपयांनी वधारले. डांगरची दोन क्विंटल आवक घटून, भाव 250 रुपयानी वधारले. सुरणची सहा क्विंटल आवक घटून, भाव 750 रुपयांनी वधारले. याशिवाय घोसावळ्याची आवक स्थिर राहून, भाव 200 रुपयानी घटला.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सहा हजार 340 गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची पाच हजार 660 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय मुळे 400 गड्ड्या, पुदीना 800 गडड्या, पालक दोन हजार 850 गड्ड्या, कांदापातीच्या दोन हजार गडड्या, करडईच्या 200 गडड्या, तर हरभऱ्याच्या एक हजार 460 गडड्‌यांची आवक झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)