सर्वात कमी वयाचा ट्रेकर होण्याचा शौनक वाघने केला विक्रम ; आतापर्यंत 12 किल्ले केले सर

अवघ्या 4 वर्षांचा ट्रेकर : आतापर्यंत 12 किल्ले केले सर

नगर: सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या लिंगाण्याचा गगनचुंबी सुळका पाहूनच अनेकांच्या मनात धडकी भरते, हा किल्ला सर करणे म्हणजे ट्रेकर्स साठी मोठे आव्हान असते, मात्र हे आव्हान लीलया पेलत नगरमधील अवघ्या 4 वर्षाच्या शौनक अनिल वाघ याने हा बेलाग असा लिंगाणा किल्ला सर करून राज्यातील सर्वात कमी वयाचा यशस्वी ट्रेकर होण्याचा पराक्रम केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लिंगाणा किल्ला महाड पासून इशान्येस सोळा मैलावर असून सह्याद्रीच्या मुख्य रांगेत तोरणा व राजगड यांचे दरम्यान आहे. मोऱ्यांचा पराभव केल्यावर शिवाजी महाराजांनी रायगडाजवळ हा किल्ला बांधला, लिंगाणा किल्ला रायगड़चा पूरक होता, त्याच्या डागडुगीचे काम रायगड़ाबरोबरच चालत असे, रायगड जर राजगृह तर लिंगाना कारागृह. इथला बेलाग सुळका आणि निसरडी माती म्हणजे यासाठी अतिशय अनुकूल होत्या की जर कैद्यापैकी कोणी पळण्याचा प्रयत्न केला तर त्याला जीव गमावणे हाच एक उपाय. गडावरचे दोर आणि शिड्या काढुन घेतल्या की गडावरून पळण्याच्या वाटा बंद. गडावरचे क्षेत्रफळ सुद्धा कमी जवळ जवळ 250 मीटर 3000 फुट उंचीचा लिंगाणा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टिने अंत्यत अवघड व कठीण समजला जातो, किल्ल्‌यावर फक्त दोराच्या सहाय्यानेच चढता येते या सुळक्‍याला सर करायला जवळ जवळ 3 ते 4 तास लागतात.

भल्याभल्यांची लिंगाणा सुळका पाहून भंबेरी उडते किल्ला खालून पाहूनच अनेकांच्या मनात धडकी भरते. मात्र अहमदनगर मधील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स चे संचालक अनिल वाघ यांचा मुलगा शौनक अनिल वाघ याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी लिंगाणा किल्ला सर करत राज्यातील सर्वात कमी वयात लिंगाणा ट्रेक करण्याचा पराक्रम केला. शौनकला त्याचे वडील अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची आई सोनाली वाघ, मयूर म्हस्के, शुभम निर्मळ, ऋषिकेश भोसले, ऋतुजा भोसले यांचे सहकार्य लाभले. 4 वर्षे वयाचा शौनक श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला मध्ये बालवाडी च्या छोटया गटात शिकत असून शौनक दर महिन्याला एक गडकिल्ल्‌याचे ट्रेक करत असतो, आत्तापर्यंत शौनक ने 12 गड किल्ले सर केले असून त्यामध्ये रायगड, वासोटा, हरिहरगड, गोरखगड, तिकोना, भैरवगड, सज्जनगड, भोरगड, अंकाई, टंकाई, चावंड व लिंगाणा आदी किल्यांचा समावेश आहे.सध्या शौनक ट्रेकिंग बरोबर, कराटे, स्केटिंग व अन्य मर्दानी खेळ आदींचे प्रशिक्षण घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)