सर्वात अल्पवयीन ब्रिटिश इसिस दहशतवादी महिलेस जन्मठेप 

लंडन (ब्रिटन): ब्रिटनमधील सर्वात कमी वयाच्या इसिस दहशतवादी महिलेस न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. सफा बाऊलर असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या इसिस महिला दहशतवाद्याचे नाव आहे. पॅरोलवर सुटण्यासाठी अर्ज करण्यापूर्वीही तिला कमीत कमी 13 वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहेत.
सफा बाऊलर ही ब्रिटिश महिला मूळ मोरक्को वंशीय असून तिचे वय केवळ 18 वर्षे आहे. सीरियामध्ये जाऊन ती इसिस या दहशतवादी संघटनेत सामील झाली होती. ब्रिटनमधील काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठिकाणांवर हल्ला करण्याचे कट कारस्थान रचल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. न्यायालयात तिच्यावरील आरोप सिद्ध झाले असून न्यायालयाने तिला जन्मठेप सुनावली आहे.
शुक्रवारी सफा बाऊलर हिला न्यायालयात सादर केले. सफा बाऊलरने न्यायालयाला सांगितले की आपल्याला पश्‍चात्ताप झालेला असून आपण इस्लाम आणि दहशत वादी विचारांचा त्याग केलेला आहे. मात्र तिच्या दाव्याकडे दुर्लक्ष करत न्यायाधीशांनी तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तिच्या एकूण वागण्यावरून तिच्या विचारांत बदल झाल्याचे कोणतेही लक्षण, कोणताही पुरावा दिसत नाही. आपण काय करत आहोत याची पूर्ण जाणीव असतानाच तिने सर्व दहशतवादी कारस्थाने केलेल्या आहेत. दहावीत शिकणारी सफा बाऊलर परीक्षेच्या तयारी काळातच इसिस दहशतवादी नवाद हुसेन याच्ता संपर्कात आली होती. ब्रिटिश म्युझीयमवरील दहशतवादी हल्ल्याची माहिती सांकेतिक भाषेत लपवल्याचा आरोप सफा बाऊलवर ठेवण्यात आला होता.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)