सर्वाजनिक ठिकाणी थुंकलेली जागा साफ करण्यासोबत दंडही आकारणार

तल्लफबाजांवर खास पथकांचा असणार “वॉच’

पुणे – दुचाकी, चारचाकी, पीएमपी अथवा एसटीतून प्रवास करत असताना तसेच पायी चालताना रस्त्यावर थुंकणे हे तल्लफबाजांना चांगलेच महागात पडणार आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या खास पथकांचा थेट “वॉच’ राहणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे थुंकल्यास त्यांनाच ती घाण साफ करावी लागणार आहे. शिवाय शंभर रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही महापालिका प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकु नये यासाठी कायदा तयार केला आहे. तसेच, शंभर ते एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार महापालिका आणि राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. मात्र, हे वास्तव असतानाही सार्वजनिक ठिकाणे, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालयांमध्ये जिन्यात अथवा कार्यालयाच्या कोपऱ्यात थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. अशा तल्लफ बहाद्दरांवर महापालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे, असा इशारा पालिका घनकचरा विभागाचे सह आयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी “प्रभात’ शी बोलताना दिली.

गेल्या दोन दिवसांत या पथकांच्या माध्यमातून औंध, बिबवेवाडी, सहकारनगर, कात्रज, टिळक रस्ता आणि शहराच्या मध्यवस्तीच्या भागात शंभर जणांवर कारवाई केली आहे. तसेच, त्यांच्याकडून केवळ दंड न आकारता घाण केलेली जागा साफ करून घेण्यात येत आहे, अशी माहिती मोळक यांनी दिली.

या कारवाईसाठी क्षेत्रीय कार्यालय आणि मुख्य कार्यालये यांची सोळा पथके तैनात करण्यात आली आहे; या पथकांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये आणखी कडक धोरण अवलंबण्याचा महापालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. त्याबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येणार आहे.
– ज्ञानेश्‍वर मोळक, सह आयुक्त घनकचरा व्यवस्थापन, महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)