सर्वांना सामाजिक सुरक्षा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध

सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा थेट संवाद

नवी दिल्ली – संकटावर मात करुन उभे राहिलेल्यांशी संवाद साधतांना आपल्याला आनंद होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक सुरक्षा योजना लोकांना सक्षम करतात. सध्याच्या सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना जीवनातील अनिश्‍चिततेचा सामना प्रभावी करण्यात लोकांना साहाय्य करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर कुटुंबाला वित्तीय विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना सक्षम करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सामाजिक सुरक्षा योजनांच्या देशभरातल्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ ब्रीजच्या माध्यमातून संवाद साधला. अटल विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि वयवंदना योजना या चार महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांचा यात समावेश होता.

गरीब आणि असुरक्षितांसाठी वित्तीय सुरक्षा पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे विविध पैलू पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 2014 ते 2017 या काळात प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत 28 कोटी बॅंक खाती उघडण्यात आली. जगभरात उघडण्यात आलेल्या एकूण बॅंक खात्यांच्या ती 55 टक्के आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात आता अधिकाधिक महिलांची बॅंक खाती असल्याबद्दल आणि बॅंक खात्यांचे प्रमाण 2014 च्या 53 टक्‍क्‍यांवरुन 80 टक्‍क्‍यांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

संकटग्रस्त कुटुंबाला आर्थिक सुरक्षेची हमी देण्यासाठी सरकारने नेहमीच प्रयत्न केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सुमारे 300 रुपयांचा अत्यंत कमी हप्ता असलेल्या प्रधानमंत्री जीवनज्योती योजनेचा लाभ 5 कोटींहून अधिक लोकांना झाला आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या अपघात विमा सुरक्षा योजनेचा लाभ 13 कोटींहून अधिक जणांना मिळाला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत वर्षाला 12 रुपयांचा हप्ता भरुन लोक दोन लाख रुपयांपर्यंत अपघात विमा सुरक्षेसाठी दावा करु शकतात, असे पंतप्रधानांनी सांगितले.

वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या वयवंदना योजनेचा लाभ 3 लाखांहून अधिक वृद्ध व्यक्तींना झाला आहे. या योजनेंतर्गत, 10 वर्षांसाठी निश्‍चित 8 टक्के परताव्याची तरतूद आहे. या खेरीज प्राप्तिकर सवलतीची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी 2.5 लाखांहून 3 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि पेन्शन योजना या तीन महत्वाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे कवच गेल्या तीन वर्षात 20 कोटींहून अधिक लोकांना पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)