सर्वांना माफ केल्यास जीवनात आनंदी-आनंद – प.पू.प्रतिभाकुंवर म.सा.

निगडी – मनुष्य जीवनात सत्ता, शक्‍ती, अधिकार आणि न्यायाचा उचित उपयोग करीत नाहीत. मात्र जैन धर्मामध्ये क्षमा करणे जीवन व्यवहाराशी जोडले गेले आहे. कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ उत्तम रहावे म्हणून सर्वांनी व्यक्‍तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वांना माफी करण्याची भूमिका घेतल्यास सर्वांच्या जीवनात आनंदी आनंद होईल, असे प्रतिपादन प.पू.प्रतिभाकुंवर म. सा. यांनी केले.

प.पू.प्रतिभाकुंवरजी म. सा. पुढे म्हणाल्या, आज मानव धन संचयाच्या मागे धावत असल्यामुळे नाते संबंधात भेदभाव, तिरस्कार, द्वेषभावना अहमपणा वाढीस लागत आहे. त्यामुळे जीवनातील संवेदना बोथड होत आहेत. मन, वाणी व शरीराने कुणाचीही हिंसा न करणारा खरा संयमी व्यक्ती म्हणून गणला जातो. क्षमा हे एक परम तप आहे. जैन धर्माचे मूळ हे क्षमा आहे. प्रेम, करूणा, मैत्री आणि सहिष्णुतेने संबंध दृढ होतात. संपत्तीचा अहंकार, दर्प असणारी व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत नाही. कष्टाशिवाय मिळालेले धन, संपत्ती हे पिडा, यातना, दु:ख घेऊन येते. आई वडीलांकडून, वारसा हक्काने मिळालेल्या संपत्ती बाबात अहंकार बाळगू नये. निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवर म.सा. यांचे विशेष प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्ला म.सा., प.पू. हंसा म.सा., प.पू. पुनिती म.सा., प.पू.गरिमा म.सा., प.पू.महिमा म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवर महाराज साहेब म्हणाल्या की, विदेशी संस्कृतीच्या आकर्षणामुळे भारतीय संस्कृतीवर आक्रमण होत आहे. यामुळे बहिण-भाऊ, दीर-भावजय, सासू – सून यांच्या नात्यातील प्रेमाचे संबंध दिवसेंदिवस कमी होत असून याची जागा अहंकार, असुया आणि तिरस्काराने घेतली आहे. यातूनच महिला व मुलींवर अत्याचार वाढत आहेत. परदेशी संस्कृतीचे आक्रमण थोपवून भारतीय संस्कृती, इतिहास, संत वाड:मयाचा समावेश शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात केला पाहिजे. आपल्या संस्कृतीवरील आक्रमण थांबवायचे असेल; तर संतांच्या विचारांचा प्रचार, प्रसार व सत्य, अहिंसा, अपरिग्रहाच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन आवश्‍यक आहे असेही प.पू.प्रतिभाकुंवर महाराज साहेब म्हणाल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)