सर्वांना परवडेल अशी, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याला प्राधान्य : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यामध्ये मुंबई, पुणे व नागपूर येथे मेट्रोची कामे वेगात सुरु असून ही कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. आगामी काळात ई-बसेस तसेच अन्य पर्यायी इंधनांचा वापर करुन प्रदूषण कमी करणारी, सर्वांना परवडेल अशी व पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

चिटणवीस सेंटर येथे केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीने आयोजित ११ व्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, महापौर श्रीमती नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर, जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन ने, सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देऊन पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते हॅकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. ‘हरित शहरी वाहतूक’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढत आहे. भविष्यात तो अधिक झपाट्याने वाढणार आहे. दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी नागरीकरण आता एकवटत असल्याचे आढळून येत आहे. यापुढे आपल्या शहरांचा दर्जा तेथील वाहतूक सुविधा व व्यवस्थेवर ठरणार आहे. वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ होते ही बाब खरी आहे. यामुळे यावर उपाय शोधणेही गरजेचे आहे. यासाठी सर्वांना परवडेल अशी, पर्यावरणपूरक व शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येत आहे.

राज्यभरात मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत मेट्रोची कामे वेगात सुरु असून नागपूर येथील महामेट्रोचे प्रकल्प पथदर्शी ठरत आहे. राज्यातील मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत ५७० किलोमीटर लांबीची कामे आहेत. यापैकी ४०० किलोमीटरच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर २६० किलोमीटरची कामे सुरु करण्यात आली आहेत. राज्यातील मेट्रोची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

पर्यायी इंधन तसेच वाहतूक व्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रस्ते बांधणीत क्रांती होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वांसाठी उपयुक्त ठरली पाहिजे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समन्वय साधण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना खऱ्या अर्थाने सुविधा मिळणार आहेत. राज्यात ई-बसेस तसेच इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या परिषदांच्या आयोजनाद्वारे वाहतूक व्यवस्थेसंदर्भात आदान-प्रदान होईल व या विचारमंथनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)