सर्वांत उंच काचेचे एलिव्हेटर

चीनने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेली प्रगती थक्‍क करणारी आहे. लांबच लांब समुद्रावर उभे केलेले पूल, गगनचुंबी इमारती, ढगांची दिशा बदलून-त्यांना अडवून पाऊस पाडण्याचे तंत्र अशी एक ना अनेक उदाहरणे चीनच्या वैज्ञानिक प्रगतीच्या आविष्कारांची सांगता येतील. चीनला जगावर साम्राज्य गाजवायचे आहे हे एव्हाना लपून राहिलेले नाही. त्यामुळेच जे करायचे ते जगात सर्वोच्च असले पाहिजे, अग्रस्थानी असले पाहिजे असा ध्यासच जणून चीनने घेतला आहे. त्यामुळे सर्वांत उंचावरून धावणारी रेल्वेसारखे प्रकल्प चीन राबवत आहे.

अनेकांना हे माहीत नसेल पण जगातील सर्वात उंच काचेचे एलिव्हेटर चीनमध्ये आहे.
चीनच्या 326 मीटर उंच काचेच्या एलिव्हेटरची छायाचित्रे आता व्हायरल झाली आहेत. “हंडेड डॅगन स्काय लिफ्ट’ नावाचे हे एलिव्हेटर झिआंगजियाजी फॉरेस्ट पार्कच्या वुलिंगयुआनमध्ये डोंगराच्या कडेवर बनवण्यात आला आहे. ते बनवण्यासाठी 126 कोटींचा खर्च आला होता. पीपल्स डेली चायनाच्या वृत्तानुसार, हे जगातील सर्वात उंच एलिव्हेटर आहे. यात तीन काचेचे एलिव्हेटर्स बनवले गेले आहे. प्रत्येक एलिव्हेटर एकाच वेळी 50 लोकांना 1 हजार 70 फूट उंचापर्यंत घेऊन जायला सक्षम आहे.

1999 मध्ये ते बनवायला सुरुवात झाली होती आणि पूर्ण 2002 मध्ये झाले. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे ते बंद करण्यात आले होते. 2003 मध्ये ते पुन्हा सुरु करण्यात आले. झिआंगजियाजी, 3 हजार 670 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले वन्य उद्यान आहे. त्यास जागतिक वारसास्थळाचाही दर्जा मिळाला आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)