सर्वसामान्यांना शिक्षण देणारी संस्था- संजय जोशी 

दादा चौधरी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 

नगर: हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालय तळागाळातील व सर्वसामान्याना शिक्षण देणारी संस्था म्हणून शहरात नावलौकिक आहे. शहरातील हि सर्वात जुनी शाळा असून दिमाखाने उभी आहे. 7 वर्षांपासून अध्यक्ष अजित बोरा यांच्या काळात शाळेची प्रगती झाली आहे.शाळेतील शिक्षक मनलावून चांगले कार्य करीत आहेत. विदयार्थ्यांनी खेळात भाग घेऊन चांगली कामगिरी केली त्याचे अभिनंदन असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी बोलत होते यावेळी माजी मानद सचिव सुनील रामदासी, उपाध्यक्ष मोहनशेठ कुकरेजा,अनंत पाठक,माजी उपाध्यक्ष रणजित श्रीगोड, दादा चौधरी विद्यालयाचे अध्यक्ष अजित बोरा, भाई सथा नाईट स्कुलचे अध्यक्ष डॉ पारस कोठारी, मधुसूदन सारडा, ह.सा.शिंदे, शालेय समिती सदस्य बागेश्री जरेंडीकर, अभय जामगावकर, अशोक उपाध्ये, अँड मंगला कोठारी, घुमरे, अनघा जामगावकर, निर्मलाताई भंडारी सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे, मुख्याध्यपक संजय मुदगल, रोहिणी फळे, सुनील सुसरे,बंडू भोसले, वर्षा कुलकर्णी, स्नेहसंमेलन प्रतिनिधी ज्योती बोलके, प्रसाद एडके, दीपक गौतम आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात हिंदसेवा मंडळाचे नवनिर्वाचित मानद सचिव संजय जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन प्रा. संजय क्षेमकल्याणी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच चित्रकला स्पर्धेचे उदघाटन बाबा नगरवाला यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. मुख्याध्यापक संजय मुदगल यांनी शाळेच्या वार्षिक अहवाल वाचन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)