सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठीच महापुरुषांचा जीवनसंघर्ष – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे – महापुरुष हे कोण्या एका जातीचे, धर्माचे नसतात. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा जीवनसंघर्ष असतो. त्यामुळे जाती धर्मापलीकडे जाऊन एकात्म आणि एकसंघ होण्यासाठी शिवाजी महाराज यांच्यासह अनेक थोर महापुरुष हे प्रेरक शक्ती आहेत, असे प्रतिपादन साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी केले.

महावितरण आणि महापारेषणच्या वतीने दरवर्षीप्रमाणे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य वक्ते म्हणून डॉ. सबनीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून अधिक्षक अभियंता महेंद्र दिवाकर, अनिल कोलप, सुंदर लटपटे, सतीश गायकवाड, जयंत कुलकर्णी उपस्थित होते.

-Ads-

शिवाजी महाराजांनी माणुसकीच्या मूल्यावर आधारित स्वराज्य निर्माण केले. सर्व जातीधर्माचे सहकारी सोबत घेतले. त्यामुळे वर्तमानातील प्रश्न सोडवण्यासाठी तसेच भविष्यकाळ सुधारण्यासाठी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्त्वातील आणि इतिहासातील प्रेरक सूत्र स्वीकारली पाहिजेत असे सबनीस म्हणाले. मस्के यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबा शिंदे यांनी केले तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी वायफळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिकसंबंध अधिकारी रामगोपाल अहिर तसेच सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)