सर्वसामांन्याच्या अर्थकरणाशी कारखान्याची नाळ

माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील ः

अकलूज- श्री शंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही विकासाला गती देणारी असून तालुक्‍यातील प्रत्येकाच्या अर्थकारणाशी या कारखान्याची नाळ जोडलेली आहे. कारखाना उत्कृष्टरीत्या चालला तर परिसरातील छोटे-मोठे उद्योग, व्यापाऱ्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो, म्हणून सभासदांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील पॅनलला विजयी करावे, असे आवाहन माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले.
सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मोहिते पाटील यांनी तांदुळवाडी, जैनवाडी, कुरोली परिसराचा दौरा केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागिरदार, जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब धाइंजे, गणेश पाटील, उपसभापती मामा पांढरे, पंचायत समितीचे सदस्य प्रताप पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.
मोहिते पाटील म्हणाले की, श्री शंकर सहकारी बाबत आम्ही कधीच हस्तक्षेप केला नाही. कारखान्यावर प्रशासक नेमला गेला. त्यावेळी सभासदांच्या मागणीनुसार कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात रहावा म्हणून न्यायालयीन लढाई लढली. त्यात आपल्याला यश आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले तर बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)