सर्वरोग निदान शिबिराचा तालुक्‍यांतील रूग्णांनी लाभ घावा

रेडा- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने 8 ऑगस्ट रोजी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती प्रविण माने यांनी केले आहे.
या शिबिराचे नियोजन करण्यासाठी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची विषेश बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सपकळ, विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर, तालुका कार्याध्यक्ष अमोल भिसे, हनुमंत कोकाटे पाटील, सुरेश शिंदे, रहेना मुलाणी, वसंत आरडे व दत्तात्रय मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरासाठी पुणे येथील 27 हॉस्पिटल सहभागी होणार आहेत. शिबिराचे उद्‌घाटन बारामती टॅक्‍सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे समवेत पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
प्रविण माने म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात 13 महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. इंदापूर मधील शिबिरात जास्तीत जास्त रूग्णांना लाभ घेता यावा यासाठी रूग्णांना शिबिरात जाण्या-येण्यासाठी खाजगी बसची सोय करण्यात आलेली आहे. शिबिरात ह्दयरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, मनक्‍यांचे विकार, नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा आणि शल्य चिकित्सा व अन्य लहान-मोठ्या आजारांची तपासणी करण्यात येईल. या तपासणी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही. परंतु, शस्त्रक्रियासाठी कागदपत्रे लागतील. अशी माहिती प्रविण माने यांनी दिली. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी ही तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजूटीने काम करून शिबिरात रूग्णांना पोहचविण्याचे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)