सर्वत्र अनागोंदी कारभार – खासदार सुळे

गराडे- शेतकऱ्यांच्या मालाला हमी बाजारभाव नाही. दुधाचे बाजारभाव कोसळले आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, महिलांवर होणारे अत्याचार, स्त्रिभ्रुण हत्या असे अनेक प्रश्‍न आहेत. सर्वत्र अनागोंदी कारभार आहे, असे प्रतिपादन बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे झालेल्या सभेत खासदार सुळे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, सुदामआप्पा इंगळे, शामकांत भिंताडे, राहुल शेवाळे, विठ्ठलआप्पा झेंडे, विराज काकडे, शिवाजी साळुंके, पप्पु भोंगळे, नवनाथ बोरावके, सरपंच सोनाली झेंडे, उपसरपंच समीर झेंडे, माजी सरपंच फुलाबाई झेंडे, पोलिस पाटील सारीका झेंडे, अविनाश झेंडे, तात्यासाहेब काळे, प्रमोद टिळेकर, निलेश काळे, तुषार काळे, बबन खटाटे, अजित गोळे, बाळासाहेब झेंडे आदी उपस्थित होते. पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शिवाजी पोमण, महिला अध्यक्षा गौरी कुंजीर, युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चेतन जाधवराव, युवती अध्यक्षा हेमलता भामे यांनी दौऱ्याचे नियोजन केले. प्रास्तविक शरद झेंडे यांनी केले. भाऊसाहेब झेंडे यांनी सुत्रसंचालन केले. अमर झेंडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)