सर्वच शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्न हवे

File Photo

सुरेश प्रभू : जगात भारतातील उत्पादनाला मोठी मागणी

पुणे – देशातील शेती उत्पादनाला जगभरातून मागणी आहे; पण आपण काही ठराविक शेती मालाच्या निर्यातीवरच भर देत आलो आहोत. त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. यापुढील काळात सगळ्याच प्रकारच्या शेती उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्रयत्न केले तरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपला टिकाव लागेल, असे मत केंद्रीय व्यापार व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्राच्या कृषी निर्यात धोरणाची माहिती राज्यातील शेतकरी व संबंधित घटकांना व्हावी यासाठी अपेडा व महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळ यांच्यावतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या समारोप सत्रात सुरेश प्रभू बोलत होते. याप्रसंगी कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे सहसचिव संतोषकुमार सरंगी, अपेडाचे अध्यक्ष पवनकुमार बोरठाकूर, कृषी आयुक्त एस. पी. सिंग, कृषी पणन मंडळाचे संचालक दीपक तावरे, कार्यकारी संचालक सुनील पवार उपस्थित होते.

देशात विविध प्रकारचा शेती माल तयार होत असताना हा माल जागतिक बाजारपेठेत पाठविण्यासाठी आवश्‍यक असणारे कृषी निर्यात धोरण तयार करण्यास खूप वेळ लागला आहे. हे धोरण पंचवीस वर्षांपूर्वीच तयार व्हायला हवे होते. आम्ही फक्त धोरण तयार केले नाही तर त्यांची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे. त्याचा फायदा आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.

आपला माल कसा निर्यात होऊ शकतो याचा अभ्यास प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे. त्यासाठी काही बदल स्विकारले पाहिजेत. शेतीला आधुनिकीकरणाची जोड दिली पाहिजे, असेही प्रभू यांनी सांगितले. यावेळी शेती माल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले.

घसरलेल्या दराचा शेतकऱ्यांना फटका

कृषी मालाची निर्यात म्हटले की साखर आणि दूध पावडर यावर आपला जास्त भर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरीचे दर पूर्णपणे घसरले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यापुढे असे होता कामा नये. प्रत्येक शेती मालाच्या निर्यातीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जगभरातील विविध देशांमधून आज भारतातील शेती मालाची मागणी वाढत आहे, असे प्रभू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)