सर्वच माजी सैनिकांना शंभर टक्के घरपट्टी सवलत देण्याची मागणी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड मनपाच्या हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक माजी सैनिकांच्या घराला 100 टक्के कर सवलत मिळावी, आशी मागणी माजी सैनिक ज्येष्ठ नागरिक जन आंनदोलन कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण रुपणर यांनी केली आहे. सध्या फक्त पेन्शन घेणाऱ्याच माजी सैनिकांना ही सवलत मिळत असून, काही कारणाने नोकरी पूर्ण न करु शकलेल्या माजी सैनिकांना ही सवलत मिळत नाही.

याबाबत विचारणा केली आसता असे आयुक्ताने सांगितले की, जो कसम परेड घेता, तो सोल्जर होत आसतो. त्याला पुढील सर्वच नियम लागू होतात. तेव्हा येथे भेदभाव करायला नको. 2010 साली आम्ही सर्व माजी सैनिकांनी मागणी केली आसता त्यावेळी पिं.चिं मनपाने फेरप्रस्ताव मंजूर केला. पण, ही सवलत पेन्शन घेणाऱ्या सैनिकांनाच देण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे, आशी विनंती समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)