सर्वच डाळी सामान्यांच्या आवाक्‍यात

उत्पादनही वाढले : भाव 75 रुपयांच्या आत
पुणे – समाधानकारक पाऊस, पोषक वातावरणामुळे यावर्षी देशात डाळींचे उत्पादन अधिक झाले आहे. त्यामुळे गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भुसार बाजारात डाळींची आवक वाढली आहे. मागणीच्या तुलनेत ही आवक जास्त आहे. त्यामुळे सर्वच डाळींचे किलोचे भाव 75 रुपयांच्या आत आले आहेत. त्यामुळे आता सर्व डाळी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आल्या आहेत.
चांगल्या पावसामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. जुलै-ऑगस्टनंतर सर्वच डाळींच्या भावांत घसरण सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षात तुर डाळीचे दर 200 रूपये किलो होते. तर गेल्यावर्षी घाऊक बाजारात मूगडाळ 100 रुपये, मसूरडाळ 70 रुपये, उडीदडाळ 147 रुपये आणि हरभराडाळीचा भाव 73 रुपयांपर्यंत गेला होता. आत्ताच्या परिस्थितीत सर्वच डाळींचे भाव 75 रुपयांच्या आतच आहेत.
याबाबत डाळींचे व्यापारी नितीन नहार म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वच डाळींची आवक चांगल्या प्रमाणात होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे सर्वच डाळींना उठाव कमी आहे. जवळपास सर्वच डाळींचे शंभर रुपयांच्या आत आले आहेत. सरकारने जीएसटीमधून अन्नधान्य वगळल्याने डाळी आवाक्‍यात राहण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील काळात आवक वाढल्यास दरात आणखी घट होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)