पणजी – गोवा सरकारने अकाऊंट पदाच्या 80 जागांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्याला तब्बल आठ हजार उमेदवारांनी प्रतिसाद दिला.पण त्यांची त्या पदासाठी जेव्हा लेखी परिक्षा घेण्यात आली त्यावेळी ते सारेच उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याचे जाहीर झाले आहे. या लेखी परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 100 पैकी किमान 50 गूण मिळणे अपेक्षीत होते पण त्यातील एकाही उमेदवाराला तितके गुण मिळू शकले नाहीत.
गेल्या जानेवारी महिन्यात ही परिक्षा घेण्यात आली होती त्याचे निकाल अलिकडेच जाहीर झाले आहेत. पाच तासांच्या या लेखी परिक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अकाऊंट्स या विषयावर प्रश्न विचारण्यात आले होते. या परिक्षांच्या विषयावरून आम आदमी पक्षाने सरकारवरच टीका केली आहे. त्यांच्या प्रवक्त्याने नमूद केले आहे की या परिक्षेत एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाहीं याचा अर्थ राज्यातील शिक्षण पद्धतच किती खालावलेली आहे हे यातून स्पष्ट झाले आहे.
या परिक्षांचे निकाल जाहीर करण्यास मोठाच विलंब लावण्यात आला आहे त्याचे कारणही सरकारने स्पष्ट केले पाहिजे अशी मागणी या पक्षाने केली आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा