सर्वगुणसंपन्न विद्यार्थी हिच देशाची खरी संपत्ती : सौ. वेदांतिकाराजे भोसले

सातारा ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सौ. वेदांतिकाराजे भोसले, सौ. डिंपल जाधव व इतर.

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) – आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षणाला पर्याय नाही. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे. कला, क्रीडा आणि शैक्षणिक प्रगती साधून विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न झाले पाहिजे. सर्वगुणसंपन्न विद्यार्थी हिच खरी देशाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या शाहू ऍकॅडमी ऍण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील 10 वी व 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ. डिंपल जाधव आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
छ. शाहू ऍकॅडमी ऍण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या 10 वीचा आणि 12 वीचा निकाल 100 टक्‍के लागला असून 100 टक्‍के निकालाची उज्वल परंपरा या महाविद्यालयाने अबाधित राखली, ही बाब उल्लेखनीय आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे, त्यांना क्रीडा क्षेत्रातही आघाडीवर ठेवणे आवश्‍यक आहे. या बदलत्या आणि स्पर्धेच्या युगात सर्वगुणसंपन्न नागरिकच टिकू शकतील. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवून देशाचा पाया भक्‍कम करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
इ. 12 वी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थी सावनी कान्हेरे (94 टक्‍के), नेहा घोरपडे (90 टक्‍के), मिहिर फडके (90 टक्‍के) तर 10 वीतील गुणवंत विद्यार्थी वैष्णव मालगावकर (96.40 टक्‍के), ऋचा गायकवाड (95.60 टक्‍के), उर्मिल लोखंडे (95.60 टक्‍के), कौस्तुभ कोकाटे (95.40 टक्‍के) आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)