सर्जिकल स्ट्राईकबाबत मोदींचे भाष्य खोटे आणि बिनबुडाचे-पाकिस्तान

इस्लामाबाद (पाकिस्तान) -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेले भाष्य खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा पाकिस्तानने आरोप केला आहे. एखादी खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा संगितल्याने ती खरी होत नाही, असे सांगत पाकिस्तानने सन 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकचा भारताचा दावा फेटाळला आहे.

सर्जिकल स्ट्राईकबाबत मीडिया आणि भारतीय जनतेला सांगण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देण्यासाठी आम्ही थांबलो होतो. अकरा वाजल्यापासून आम्ही त्यांना फोनवर ही बातमी देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु पण फोन कॉल घ्यायचे त्यांना धाडस झाले नाही. अखेर बारा वाजता आम्ही त्यांच्याशी बोललो आणि नंतर भारतीय प्रसार माध्यमांना सर्जिकल स्ट्राईकची माहिती दिली असे मोदींनी लंडनमध्ये काल “भारत की बात, सब का साथ’ कार्यक्रमात सांगितले.

-Ads-

सर्जिकल स्ट्राईकबाबत भारताचे दावे खोटे आणि बिनबुडाचे आहेत, एखादी खोटी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली म्हणून ती खरी होत नाही; असे मोदींच्या या भाष्यावर टिप्पणी करताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी म्हटल्याचे डॉन या वृत्तपत्राने म्हटले आहे.

पाकिस्तान दहशतवादाची निर्यात करतो या मोदींच्या वक्‍तव्यावर फैजल यांनी सांगितले की वास्तव याच्या उलट आहे. भारतच दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे आणि कुलभूषण जाधव हा त्याचा पुरावा आहे.कुलभूषण जाधव यांना 3 मार्च 2016 रोजी अशांत बलुचिस्तानमधून पकडल्याचा पाकिस्तानने दाव केला आहे, तर पाकिस्तानने त्यांचे इराणमधून अपहरण केल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)