सर्जिकल स्ट्राईकचे कमांडो नाईक संदीप सिंह दहशतवाद्यांबरोबर चकमकीत शहीद

नवी दिल्ली – सर्जिकल स्ट्राईकचे एक हीरो कमांडो संदीप सिह दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. तंगधार येथे घूसखोरांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले.

4 पॅरा उधमपूर येथे ड्यूटी असलेल्या संदीप सिंह यांना घूसखोरांना रोखण्यासाठी तंगधार येथे पाठवण्यात आले होते, त्यांनी तीन दहशतवादी टिपले, परंतु चकमकीत ते जखमी झाले. त्यांना श्रीनगरमधील 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, पण त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील कोटला खुर्द गावच सुपुत्र संदीप सिंह 2007 साली लष्करात भर्ती झाले होते. संदीप सिंह यांना एक पाच वर्षांचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या जांबाज जवानांमध्ये संदीप सिंह यांचाही समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)