सर्जिकल स्ट्राइकच्या व्दिवर्षी पूर्तीनिमित्त “पराक्रम पर्व’

पुणे – भारतीय सैन्याने पाकिस्तानधील दहशतवादी तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सैन्य दलाकडून देशभरात “पराक्रम पर्व’ साजरा केला जाणार आहे. 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या या पर्वासाठी पुण्यातही जय्यत तयारी चालू असून, या कालावधीत लष्करातर्फे गोळीबार मैदान येथे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, अशी माहिती लष्कर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

सैन्य दलातर्फे 2016 साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून दहशतवादी तळ उदध्वस्त करण्यात आले होते. विक्रमी वेळेत अतिशय शिस्तबद्धरीत्या पार पाडलेल्या मोहिमेत भारतीय सैन्याला मोठे यश मिळाले होते. यासाठी देशातूनच नव्हे, तर जागतिक स्तरावरून सैन्यदलावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. सैन्याच्या याच कर्तृत्व, शिस्त आणि शौर्याचे स्मरण नागरिकांना कायम रहावे, यासाठीच या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. गोळीबार मैदान येथे सकाळी 10 ते 6 यावेळेत हे शस्त्रास्त्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे. तसेच या दरम्यान सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मिलिटरी बॅन्ड’चे सादरीकरणदेखील होणार आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
5 :blush: Great
2 :cry: Sad
7 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)