“सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ समीक्षा ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्ली: प्रसिध्द मराठी चिंतनशील लेखक डॉ. म. सु. पाटील लिखित “सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ यासमीक्षा ग्रंथास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा वर्ष 2018चा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे.

रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी पत्रकार परिषदेत देशातील प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांच्या नावांची घोषणा केली.

-Ads-

मौज प्रकाशनाने 18 एप्रिल 2013मध्ये “सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. या ग्रंथात डॉ. म. सु. पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे.

कोकणी कवी परेश नरेंद्र कामत यांच्या “चित्रलिपी’ या काव्य संग्रहास कोकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट कलाकृतीचा, तर लेखिका चित्रा मुद्गल लिखित “पोस्ट बॉक्‍स नं. 203-नाला सोपारा’ या कादंबरीस हिंदीतील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण पुढील वर्षी 29 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिध्द साहित्यिक ना.धो.महानोर, मधुकर वाकोडे आणि प्रा. रमेश वरखेडे यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)