सराव सामना न खेळणे योग्यच – विराट कोहली

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना न खेळण्याचा निर्णय योग्यच आहे, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. या सामन्यातील खेळपट्टी ही न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याच्या 15 टक्‍केही नाही, असे स्पष्टीकरण कोहलीने दिले. पहिल्या अभ्यास सत्रानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कोहली म्हणाला, आपण निश्‍चतपणे सांगू शकत नाही की सराव सामन्यातून तुमची खेळी उत्कृष्टच होईल. त्याऐवजी अभ्यास सत्रावर लक्ष्य केंद्रीत करणे योग्य आहे, ज्याच्यावर आपले नियंत्रण असते.

कोहली म्हणाला, सराव सामन्यासाठीची खेळपट्टी आणि सामन्यासाठी मिळणारी खेळपट्टी यांच्यात 15 टक्केही समानता नसते. तसेच सराव सामन्यात सर्वांना खेळण्याची संधी मिळण्यासाठी झटपट खेळी करावी लागते. त्यामुळे दोन दिवस व्यर्थ घालविण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी दोन सत्रात केलेल्या अभ्यास योग्य आहे, जो आम्ही करत आहे. या अभ्यास सत्रातून आम्ही कसोटीत लय साधून स्वःताला सिद्ध करू शकतो, असे त्याने सांगितले.

-Ads-

कसोटी मालिका खेळण्यापूर्वी सर्व खेळाडूंची सकारात्मक मानसिकता ठेवण्यावर भारतीय कर्णधाराने भर दिला आहे. जे अपरिहार्यपणे सराव सामन्यातून करणे शक्‍य नाही. आपली मानसिकता योग्य असल्यास आपण सराव सामने खेळलो की नाही याचा काहीही फरक पडत नाही. जर तुमचा चांगला अभ्यास असेल आणि दबावात न येता मैदानात उतरल्यास त्याचे चांगलीच परिणाम दिसून येतात, असे कोहली म्हणालाभारतीय संघाने शनिवारी दोन सत्रात कसून सराव केला. तसेच त्यांना अपेक्षीत असलेल्या खेळपट्टीनुसार फलंदाजी व गोलंदाजीत विविध प्रयोग केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)