सराफ पेढीतून मंगळसूत्र लंपास

पिंपरी – पिंपळे सौदागर येथे पी. सी. ज्वेलर्स या दुकानातून 12.730 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले.

रोहीत राजेंद्र मुथ्था (वय-28, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुथ्था हे दुकानात व्यवस्थापक म्हणून काम करतात. यावेळी रात्री दुकान बंद करत असताना त्यांना 12.370 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)