सराफाची अडीच लाखांची फसवणूक

पिंपरी – ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो अशी बतावणी करत दागिने खरेदी करून सराफाची अडीच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी गुरूवारी (दि. 29) एकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विश्वनाथ बाजीराव पाटणकर (वय-53, रा. फॉर्च्युन बिजनेस सेंटर, कस्पटे वस्ती) असे फसवणूक झालेल्या सराफाचे नाव आहे. या प्रकरणी शेखर देवरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

17 फेब्रुवारी 2018 रोजी आरोपी देवरे हा त्यांच्या दुकानात आला. 2 लाख 32 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. तसेच त्यांचा विश्वास संपादन करून दागिन्यांचे पैसे आरटीजीएस द्वारे हस्तांतरित करतो असे सांगून दागिने घेऊन गेला. त्यानंतर पाटणकर यांनी देवरेला दागिन्यांचे पैसे मागितले असता मी तुमचे पैसे दिले आहेत, माझ्यासमोर येऊ नका, रोडवर फिरणे मुश्‍किल होईल, अशी धमकी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)