सराफवाडीच्या विद्यार्थ्यांची इंदापूर महाविद्यालयास भेट

रेडा- सराफवाडी (ता. इंदापूर) येथील नंदकिशोर प्रगती विद्यालयातील माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास क्षेत्रीय भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, मुख्याध्यापक अर्जुन दोलतोडे यांच्या प्रेरणेतून रमेश नलवडे आणि अंकुश काळे या शिक्षकांनी सराफवाडी प्रशालेतील 52 विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील विविध विभागांना भेटी देऊन त्यांची महाविद्यालयीन शिक्षणाविषयी असणारी जिज्ञासा वाढविली. विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याबद्दलची व महाविद्यालयाच्या “करके तो देखो’ या उपक्रमाची चित्रफीत दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांना हायब्रीड पॉवर स्टेशन, टोमॅटीक वेदर स्टेशन, ग्रंथालय, क्रीडा संकुल, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र, फिस्ट लॅब, जिओगार्डन दाखविण्यात आले. सर्पाविषयीची माहिती देण्यात आली. महाविद्यालयात खूप काही शिकण्यासारखे आहे. ते येथे मला शिकायला आवडेल, असे वैष्णवी धालपे हिने सांगितले. उत्कृष्ट महाविद्यालय असल्याचे साक्षी नाचण, मनोज तिरोडकर, अजय कांबळे यांनी महाविद्यालयातील व्यवस्थापनविषयी प्रतिक्रिया दिली.
यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, डॉ. राजाराम गावडे, डॉ. राजेंद्र साळुंखे, प्रा. गौतम यादव, प्रा. अनिकेत हेगडे, प्रा. रवींद्र साबळे प्रा. मयूर मखरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित लोंढे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)