सराई दुचाकीचोरट्यास बेड्या

यवत- दौंड तालुक्‍यातील यवत पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरास सात दुचाकीसह जेरबंद केले आहे. त्याच्याकडून आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्‍यता यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरज बंडगर यांनी वर्तवली आहे.
शंकर अर्जुन माळी (रा. निमोणे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या सराईत दुचाकी चोराट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यासह ग्रामीण भागात दररोज दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते त्यामुळे दुचाकी चोरांचा छडा लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान, यवत पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलीस नाईक मंगेश कदम, रविंद्र गोसावी, गजानन खत्री, तात्यासाहेब कऱ्हे हे केडगाव-चौफुला परिसरात गस्त घालीत असताना या दुचाकी चोराबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार या पोलीस पथकाने सापळा लावून माळीला अटक केली. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या छप्परच्या घरात चोरी केलेल्या सहा दुचाकी आढळून आल्या. तर आणखी एक दुचाकी माळीचा मित्र हेमंत झुंबरलाल घाटविसावे (रा. मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यास विकल्याचे सांगितले. यानंतर पोलीस पथकाने हेमंत घाटविसावे यासही दुचाकी हस्तगत करीत अटक केली आहे. या चोरीच्या गुन्ह्यातील यवत पोलिसांनी 7 दुचाक्‍या हस्तगत केल्या आहेत. पोलीस पथकाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, पोलीस अधिकारी गणेश मोरे यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. तर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी चांगल्या कामगिरी बद्दल पथकाला 5 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. पुढील तपास पोलिस नाईक रविंद्र गोसावी करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)