सराईत सहा चोरटे जेरबंद

पिंपरी – मोबाईल चोरी, वाहन चोरी, लॅपटॉप चोरी करणाऱ्या तीन जणांना चिखली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सुरेश देवराव राऊत (वय-18, नेवाळेवस्ती, चिखली), सोमनाथ साहेबराव भगत (वय-18, रा. पत्राशेड, चिंचवड), दिनेश राम कोळी (वय-22, रा. मोरेवस्ती, चिखली), रोहित चंद्रकांत जुजगर (वय-22, रा. रुपीनगर, तळवडे), प्रवीण देविदास पारवे (वय-25, रा. शरदनगर, चिखली), अमोल हनुमंत कांबळे (वय- 30, रा. भीमशक्ती नगर, मोरेवस्ती, चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याव्यतिरिक्त दोन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह सुरेश राऊत चिखली गावठाण चौकात एक दुचाकी घेऊन संशयितरित्या थांबलेले दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 14 मोबाईल फोन जप्त करण्यात आले. हे मोबाईल फोन त्यांनी कुदळवाडी, चिखली, तळेगाव रोड भागातून चोरल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याजवळ असलेली दुचाकीविषयी चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी चिखली मधून चोरल्याचे सांगितले. तिघांकडून एकूण 2 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दुसऱ्या एका कारवाईमध्ये चेरीज स्विट चौकामध्ये मोबाईल विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोमनाथ भगत याला अटक केली. त्याच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा वन प्लस हा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईमध्ये चिखली पोलिसांनी साने चौक भाजी मंडई येथून दिनेश कोळी आणि रोहित जुजगर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी करत दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण 63 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त गणपतराव माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मसाजी काळे, पोलीस उप निरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार मंगेश गायकवाड, सुरेश जाधव, पोलीस हवालदार राम साबळे, पोलीस नाईक सुनील शिंदे, चेतन सावंत, अमोल साकोरे, विपुल होले, नरहरी नाणेकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, कबीर पिंजारी, सपकाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)