सराईत वाहनचोर पोलिसांच्या जाळ्यात सहा दुचाकी हस्तगत

पुणे – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. रविंद्र उर्फ रव्या बाळासाहेब धोत्रे (26,रा.रांजे, ता. भोर) असे आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते व तपास पथकातील कर्मचारी पॅट्रोलिंग करत असताना सराईत वाहनचोर धोत्रे हा स्वामी नारायण मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने तपासात भारती विद्यापीठ व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

या वाहनांची किंमत 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे. धोत्रे याच्यावर यापूर्वी सिंहगड व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सर्फराज देशमुख, अमोल पवार, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, कुंदन शिंदे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकरमहेश मंडलीक, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने केली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)