पुणे : सराईत मोबाईल चोर जेरबंद

11 मोबाईल हॅण्डसेट जप्त ; सहा गुन्हे उघडकीस
पुणे – गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने सराईत मोबाईल चोरांना जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातून 11 मोबाईल व्हॅण्डसेट जप्त करण्यात आले असून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दोघेही आरोपी गुलटेकडी मार्केटयार्ड येथे हमाली काम करतात. रात्रीच्या वेळी इतर हमालांनी गाळ्यावर चार्जिंगला ठेवलेल्या मोबाईलवर ते डल्ला मारत होते.
सुनिल अनंता गायके(29,रा.भाजीमार्केट, गाळा क्रमांक 567, मुळ वेल्हा ) आणी ज्ञानेश्‍वर उर्फ माऊली प्रकाश वाडघरे(27,रा.अमृता रेसिडंन्सी, मांगडेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

दोघेही आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरीता मार्केटयार्ड येथील आंबडेकरनगर येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्यांच्या ताब्यात 11 मोबाईल हॅण्डसेट मिळाले. याचीमिंकत 1 लाख 19 हजार रुपये इतकी आहे. तपासात त्यांनी हे सर्व मोबाईल मार्केटयार्ड येथील भाजी व फळ बाजारात रात्रीच्या वेळी कामगारा लोकांनी चार्जिंगला लावले असताना चोरल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी सुनिल अनंता गायके याच्याविरुध्द वारजे पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील सहा मोबाईल संदर्भात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर इतर पाच मोबाईलच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. या ठिकाणावरुन कोणाचा मोबाईल चोरीला गेला असल्यास गुन्हे शाखा युनिट एकशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीष शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक भोसले, अनिल घाडगे, अतुल साठे, आजिनाथ काळे, रोहिदास लवांडे, महेंद्र पवार, गजानन गाणबोटे, गुणशिंलन रंगम, अनिल भोसले, शिवानंद स्वामी, संदीप राठोड, संदीप तळेकर, कल्पेन बनसोडे, चालक सुजित पवार यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)