सराईत मोबाईल चोराला अटक

पिंपरी – मोबाईलच्या दुकानात चोरी करुन ते मोबाईल मध्य प्रदेशात विकणाऱ्या एका सराईत चोराला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाखांचे 15 महागडे मोबाईल जप्त केले आहेत.

गिरीराज कुसवाह (रा. मुरैना, मध्य प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात वाकड येथे दुकान फोडून मोबाईल चोरण्यात आले होते. त्यानंतर तशीच चोरी हिंजवडी परिसरात झाली. यावरुन वाकड पोलीस आरोपीचा माग काढत असताना त्याचे धागेदोरे मध्यप्रदेशपर्यंत पोहचले.

कुसवाह हा पुणे रेल्वे स्थानकावरुन मध्य प्रदेशात जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. कुशवाह हा दुकानाचे पत्रे उचकटून मोबाईल चोरात असे. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)