सराईत मटका चालक ताराचंद गडदे जेलबंद 

अकोले: डोंगरगाव येथे ग्रामरक्षक दल व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्‍त पथकाने केलेल्या कारवाईत डोंगरगाव येथे सराईत मटका चालक ताराचंद दत्तात्रय गडदे यास मटका चालवताना रंगेहाथ पकडले. अनेक दिवसांपासुन डोंगरगाव येथे दारु, मटका, जुगार असे अवैध व्यवसाय राजरोसपणे जोरात चालू आहे. अनेक तरुण या वाईट गोष्टींकडे वळाल्याने गावात वातावरण कलुषित झाले होते.अवैध व्यवसाय सुरु झाल्यापासून सकाळीच मोठ्या प्रमाणात गावात गर्दी व्हायची. कुठलेही कामधाम न करता व्यसनाधिनता वाढल्याने गावातील विद्यार्थी, मुले, महिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. अनेक परिवार, कुटुंबे यामुळे उद्धवस्त झाली आहेत. अनेक तरुण यामुळे देशोधडीला लागलेले आहेत. अनेक वेळा संबंधित अवैध व्यवसायिकांना ग्रामसभेचे ठराव, विनंती, सूचना देऊनही ऐकत नसल्याने ग्रामरक्षक दलाने निवृत्त पोलीस निरीक्षक नारायण उगले, दारुबंदी समिती सदस्य सुनील उगले याच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन यापुढे सर्व अवैध व्यवसायिकांवरती धडक कारवाई करण्याचे ठरवले होते.
त्याप्रमाणे सोमवारी ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष अमोल उगले, उपाध्यक्ष विजय उगले, रवी घुले, गणेश उगले, अमोल उगले, पपू उगले, संदीप उगले, ज्ञानेश्वर उगले, संतोष उगले, मिथुन उगले, अजय उगले, सोमा उगले, भाऊसाहेब उगले आदी सर्व ग्रामस्थांनी मिळून सबंधित मटका चालकास रंगेहाथ पकडले व अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना कळवले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस हवालदार गोंदे व लांडगे यांना पाठवून आरोपीस ताब्यात घेतले. याबद्दल डोंगरगाव ग्रामस्थांनी पोलीस अधिकारी व ग्रामरक्षक दलाचे आभार व्यक्‍त केले आहेत. तसेच यापुढेही पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी धडक कारवाई करु अवैध धंदे मोडून काढू, असे आश्‍वसन दिले. यासाठी ग्रामस्थांनी व ग्रामरक्षक दलाने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)