सराईत चोरट्याला भोसरीत अटक

भोसरी – मौजमजेसाठी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चोरट्याकडून एक जबरी चोरी व तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ओंकार ऊर्फ सोन्या विलास नागरे (वय-19, रा. डुडुळगाव) असे या चोरट्याचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई नवनाथ पोटे यांना ओंकार नागरे भोसरीमध्ये येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार सापळा रचत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने एक जबरी चोरी व तीन वाहन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड गाडी व तीन मोबाईल असा एक लाख 3 हजार रुपयांचा एवज जप्त केला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय टिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बंबाळे, हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, संदीप भोसले, संजय भोर, किरण काटकार, पोलीस शिपाई नवनाथ पोटी आदींनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)