सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार

पिंपरी – दुखापत करणे, धमकी देणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईताला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

विशाल बबन गायकवाड (वय-22, रा. गिरजुबाबा मंदिराजवळ, पिंपरी) असे तडीपार आरोपीचे नाव आहे.

-Ads-

ही कारवाई परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी केली आहे. गायकवाड याने परिसरात दहशत पसरविली होती. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते. अखेर त्याच्या तडीपारीची कारवाई करण्यात आली. परिमंडळ एक मधून 15 ऑगस्ट ते 20 नोव्हेंबर या कालावधीत एकूण 12 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये निगडी येथून 1, पिंपरी मधून 5, चिंचवड पोलीस ठाण्यातून 2 एमआयडीसी भोसरी येथून 3 तर दिघी येथून 1 अशा 12 गुन्हेगारांचा समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)