सराईत गुन्हेगाराची निर्घुन हत्या ; दोघा मार्शलचे धाडस

कोयत्याने वार करुन दगड डोक्‍यात टाकून खून

पुणे,दि. 13- जनता वसाहतीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत सराईत गुन्हेगाराचा खून झाला असून त्याचे इतर तीन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पर्वती पायथा येथील कांदे अळीतील गल्ली क्रमांक तीनच्या वर घडली. घटनास्थळावरुन पळून जाताना दोन गुन्हेगारांना दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या मार्शलनी पकडले. दरम्यान परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याचे साथीदार गणेश यादव, अमोल कदम, सुजीत बेडवे हे जखमी झाले आहेत. गणेश व अमोल यांची प्रकृती प्रकृती अतिशय गंभीर आहे. योगेश जांभळे व अभिजीत कडू असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा हल्ला चॉकलेट सुन्या या सराईत गुन्हेगाराच्या टोळीने केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निलेश वाडकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तो आरोपी आहे. नुकताच तो जामिनावर सुटला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे दाखल झाले होते.

 *दोघा मार्शलचे धाडस *
जनता वसाहतील दोन गटांत हाणामारी होऊन खून झाल्याची घटना पोलिसांना मिळताच घटनास्थळी सर्व प्रथम दिलीप पिलाणे व गणेश शिंदे हे दोन मार्शल पोहचले. तेव्हा जवळपास 15 ते 17 जणांचा जमाव निलेश वाडकरचा खून केल्यानंतर त्याच्या तीघा साथीदारांवर शस्त्राने वार करत होता. मार्शलला येताना पहाताच हा जमाव पर्वतीच्या दिशेने पळत गेला. यातील एकाला पर्वती पायथ्यावरच पकडण्यात आले तर दुसरा आरोपी झोपडपट्टीच्या दिशेने पळत गेला. त्याने पळत जाताना एका चिमुरडीला पायाखाली चिरडले. मात्र मार्शनली त्याला एका घरात घुसून ताब्यात घेतले. समोर 15 गुन्हेगारांचा जमाव असतानाही दोघा मार्शनली धाडस दाखवून आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)