सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन काडतूसे हस्तगत

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन काडतूसे हस्तगत

पुणे: एका सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी पिस्तूल व दोन काडतूसे हस्तगत करण्यात आली. ही कारवाई समर्थ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. सूरज अशोक ठोंबरे(20,रा.भाजी मंडई,धनगरवाडा, नाना पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरज ठोंबरे हा कमरेला पिस्तूल लावून फिरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस निरीक्षक सुरेश बेंद्रे , उपनिरीक्षक पी.यु.कापुरे, पोलीस हवालदार सुशिल लोणकर, काळे, पोलीस कॉन्टेबल शितोळे, बाळासाहेब भांगले , निलेश साबळे , सुमित खुट्टे, अनिल शिंदे, गणेश कोळी आणी शेख यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी संशयितरित्या फिरताना सुरज ठोंबरेला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतूसे मिळून आली. त्याच्याविरुध्द समर्थ पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या दोन गुन्हयासह तीन तर फरासखाना पोलीस ठाण्यात दोन असे पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)