सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक

पिंपरी – घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना युनिट चारच्या पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संजय भाऊराव देशमुख (वय-32, रा. भोसरी) आणि सुनील सिद्राम परमगोळ (वय-20, रा. सांगवी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-

काईम युनिट चारचे पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केलेल्या संजय देशमुख याला अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने लॅपटॉप आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी 1 लॅपटॉप आणि 2 मोबाईल असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सुनील परमगोळ याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने 2 लाख 50 हजार रुपांचे 16 स्मार्ट फोन आणि दोन लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली. तर सुनील परमगोळ याच्याकडून 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल जप्त केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)