सराईत गुंड स्वप्निल हराडे दोन वर्षासाठी तडीपार

पुणे – खडक पोलीस ठाण्याच्या परिसरातील सराईत गुंड स्वप्निल सुनील हराडे यास शहर व जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला व सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या काळात शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सराईत गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार खडक पोलीस ठाण्याच्या हद्दतील सराईत गुन्हेगार स्वप्निल हराडे (22, रा.घोरपडे पेठ) यास तडीपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द दरोड्याचा, दुखापतीचा, चोरीचा आणि शस्त्रजवळ बाळगल्याचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर 2015 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याच्या गुन्हेगारी वागण्यामध्ये कोणताही फरक पडला नाही. तो अत्यंत खुनशी व भांडखोर असून नागरिकांमध्ये कुरापती काढुन मारहाण करण्याबरोबरच गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत आहे. त्याची या परिसरात दहशत असल्याने तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याने परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)