सराईतांकडून 9 पिस्तूल, 13 काडतूस जप्त

पिंपरी – खंडणी, दरोडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगारांकडून 9 देशी बनावटीची पिस्तूल व 13 जिवंत काडतूस जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. आयुक्तालयाची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

अमोल सुर्यभान लेंडवे (वय-30, रा. इंद्रलोक कॉलनी, भोसरी), अक्षय उर्फ सागर अरुण टिळेकर (वय-22, रा. दौंड, पुणे), तुषार राजाराम सोंडकर (वय-28, रा. भोर, पुणे), सोमनाथ कैलास चव्हाण (वय-31, रा. विष्णूनगर, रायगड), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय-25, रा. तारमळा रोड, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्त घालत असताना पोलीस नाईक आशिष बोटके यांना हिंजवडी येथे बॅंगलोर-मुंबई महामार्गावरील फोक्‍स वॅगन शो रुम समोर एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली. यावेळी पोलिसांनी सापळा रचत अमोल लेंडवेला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. त्याच्या जवळ एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. त्याला पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचा मित्र अक्षय अरुण टिळेकर याच्या ओळखीने एंजट तुषार सोंडकर याच्याकडून पिस्तूल विकत आणल्याची कबुली दिली.

पोलिसांनी सोंडकर यालाही नसरापूर येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्या जवळूनही पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल व दोन काडतुसे जप्त केली. तसेच त्याच्या हॉटेलची झडती घेतली असता त्यामध्ये चार देशी बनावटीच्या पिस्टल व सहा जिवंत काडतुसे सापडली. सोंडकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अमोल व्यतिरीक्त सोमनाथ कैलास चव्हाण (वय-31, रा. विष्णूनगर, रायगड), अक्षय टिळेकर, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय-25, रा. तारमळा रोड, हवेली) यांना पिस्तूल विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी तपास करत या तिघांकडूनही प्रत्येकी एक पिस्तूल अशा तीन पिस्तूल व 3 जिवंत काडतूूस जप्त करुन त्यांना अटक केले. आरोपींकडून 2 लाख 27 हजार 600 रुपयांचे 9 देशी बनावटीचे पिस्तूल व 13 जिवंत काडतूस, स्वीफ्ट डिजायर कार असा एकूण 7 लाख 27 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)